corona.jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद : बालाजीला गेले, गावात आले, क्वारंटाईन कक्षात केली जंगी पार्टी, अन गमावला जीव...

सयाजी शेळके

उस्मानाबाद : क्वारांनटाईन सेंटर मध्ये जंगी पार्टी केली. आणि त्याच रात्री एकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अन अखेर त्याचा मृत्यू झाला. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी गावात घडली. या घटनेने येडशी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावच्या प्रमुख लोकांचाच यात सहभाग असल्याने असे गाफील वर्तन कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येडशी येथील सरपंचासह सहाजण आणि बार्शी तालुक्यातील तीन असे नऊ जण दोन जुलै रोजी तिरुपतीला एकाच गाडीमध्ये गेले होते. म्हणजे या ९ जणांनी प्रशासनाची दिशाभूल करुन ऑनलाईन पास काढून घेतले. त्यानंतर हे सर्वजण तिरुपतीहून सोमवारी आपल्या गावी परत दाखल झाले.

 गावामध्ये आल्यानंतर येडशी ग्रामस्थांनी या सहा जणांना क्वारणटाईन होण्याची विनंती केली. मात्र सरपंचासह इतर पाच जणांनी त्यास नकार दिला. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमल्याने आणि अधिकाऱ्यांच्या कानावर ही माहिती गेल्याने त्यांना क्वारणटाईन करण्यात आले. मात्र गावातील अनेकजण त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. विशेष म्हणजे या सहा जणांनी कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. तर या सहा जणांनी क्वारणटाईन कक्षातच जंगी पार्टी केल्याचे बोलले जात आहे.

पार्टीच्या दिवशीच सहा जणांपैकी एकाने औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यात हलविण्यात आले. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूणच यामध्ये मोठे गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. क्वारणटाईन असताना पार्टी केलीच कशी? असा प्रश्न गावकऱ्यातून विचारला जात आहे.

तर क्वारणटाईन कक्षात विष आलेच कोठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र तिरुपती जाण्याचं धाडस करीत स्वतःचा जीव मात्र एका नागरिकाला गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सरपंचालाही क्वारणटाईन होण्याची वेळ आली आहे. नियमांचे पालन करा आणि कोरोणाला दूर ठेवा, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केली जात असताना गावातील काही जाणते नागरिकही अशाप्रकारे चुका करून गावालाच वेठीस धरत असल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

 याची चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून येत आहे. आता पोलीस प्रशासन स्तरावर याची कशी चौकशी केली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बार्शी तालुक्यातील तिघेजण येडशीला आले कसे? नाकाबंदी असताना त्यांना प्रवेश दिला कसा? याचीही चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

संपादन प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT